थोडासा अर्वाच्य प्रकार आहे, १८ वर्षाच्या खालच्यांनी वाचु नये.
आमच्या येळी आसं काई व्हतंच नसायचं,
बायायणं लुगडं अन बवायणं धोतरचं नेसायचं,
आज कालची बाई बवाय वाणीच नेसते,
चार-चवघाय संग हिंगं उठते बसते,
हि बाई,
हि बाई शेजारणीच्या नहाणीतं घुसते,
घंट्याभरणं भाईर येवुन घाम पुसत पुसते,
मंधात हाईत ते तुम्चे मिश्टरच हाईत काय?
मह्या मिश्टराचा काल धरणं पत्त्याच न्हाय,
बवे,
बवे बीकं आज्कालचे ऐश करीती,
हापीसातल्या बेबीला हाताशी धरीती,
तिच्यावरं रोज कुरघोडी करिती,
ओव्हर टायमाचा तिला भत्ता ही देती,
पोरं- पोरी,
पोरं- पोरी बी काई कमी नाहित बुवा,
भेटी-गाठी साठी शाळा कालेजी जावा,
भेळ पुरी-पाणी पुरी कायियबी खावा,
मधातचं बंद करा डोळा त्यो डावा,
गुंडांचा तर उतं आलाय षंढांचा बाजार भरलाय,
मनं यातलाच येक नेता बनलाय,
अन मनुनच इंड्या वल्डात फ़ेमस झालाय,
आसं झाल्यानं या देसाच व्हावं तरी काय,
मला काय पुसता मीइ बीक ह्यातलाच हाय.