सौभाग्यकांक्षिणीस......

गाभूळल्या चिंचा बोरी


ठेव माहेरीच पोरी


कडे तोडे बिलवरी


तुझ्या गळा सोनसरी


मागे माय पिता दारी


भाऊराय हात धरी


वाट पाहे तिथे परी


जिवलग सखा हरी


सोड माया त्याच दारी


वाहायाचे  ओझे शिरी


नाती जन्माची ग प्यारी


ठेव उंबरठ्यावरी


सोसायाची ग तयारी


तऱ्हा आहे सारी न्यारी


न्याय नीतीचा ग भारी


जड आहे व्यवहारी...


शीला.