ब्र
ब्र नाही कढायचा
मनाच्या तळातुन
असा जीव जडवल्यावर..........
ओवाळून टाकतांना
आपलं सर्वस्व
कशी शिरलीस
या शब्दांच्या मयसभेत.......?
पतंगाची प्रीत घे साक्षीला
अन
झोकून दे संवेदना
खाक होण्यासाठी.
उरलाच तर एक
हुंदका
ठेव मागे उडणाऱ्या राखेसंगे
श्वासाच्या सोबतीला
जगण्याची खूण म्हणून.............!
(एका मैत्रिणिसाठी परत पाठवत आहे.)
शीला.