कोण आहेस तू?
माझ्या उजाड आयुष्यात कशी आलीस तू.
रखरखत्या उन्हात तापलेल्या धरणीवरती,
पाण्याचे शितल थेंब घेऊन आलीस तू.
कोण आहेस तू?
कधी न जमनाऱ्या शब्दांवर काव्य साधून
गुपीत प्रितीचे उलघडलेस तू.
कोण आहेस तू?
जशी आकशामध्ये चंद्राभोवती चांदणी,
तशी माझ्याभोवती प्रितीचा वर्षाव करीत आलीस तू.
कोण आहेस तू?
कोणीही असशील तू,
दिलेस प्रेम मजला इतके तू
न करता दूनियेची पर्वा.
होतील तितके दुःख झेलिन मी,
ठेविन तुझा चेहरा सदा हसरा.
"महेश भोसले"