मुंबई क्राईम डिपार्टमेंट

सर्वप्रथम मुंबईकरांना सलाम, अतिरेकी हल्याने जनजिवन/मुंबई/आणि पर्यायाने महाराष्र्टच "बंद" आणि उध्वस्त करु पहाणार्या अतेरिक्यांचा डाव उधळुन लावल्याबद्दल ! जरि स्फ़ोट झाले तरि मुंबई २ दिवसात रुळावर आली,ह्यातच मुंबईचे यश दिसुन येते! 


जे लोक ह्या हल्यात जीव गमावून बसले,त्यांना आदरपुर्वक  श्रध्दांजली !


परवाच एक FFD मेल आली होती त्यातील मजकुर =>


how to catch lion- newtons method-let lion catch u 1st then u can catch him as every action has equall & opp reaction.


असे बऱ्याच शास्त्रज्ञांचे नाव गुंफ़ुन हा विनोद केला होता,त्यात सगळ्यात शेवट होते => mumbai crime branch: catch a dog & irritate(torture) him at such extent that he'll commit as he is a Lion !


विनोदाचा भाग सोडा हो,पण ११ तारखेला जे झाले त्यातले ४ आरोपी पकडले ही न्युज वाचुन मला एकदम ह्या मेल ची आठवण आली....आणि खरचं वाटले की,जे लोक संशयित म्हणुन पकडले गेले आहेत ते खरचं संशयित आहेत का? की त्यांना चोपुन/पैशाचे अमिश दाखवुन कबुल करायला भाग पाडले आहे ?


खरा,गुन्हेगार पडद्याआडच रहाणार का ??


असे नाही कि माझा पोलिसी यंत्रणेवर राग आहे पण, ईमाने काम करणारे लोक अगदी हातच्या बोटावर मोजण्याईतके आहेत त्यामुळे,त्यांनाही लोकांची बोट उगारुन घ्याविच लागणार !


सगळिकडे बंद,दंगल अरे कशासाठी??? कोणीतरि पेटवतो आणि तुम्ही पेटता ??  हेच तर हव आहे अतिरेक्यांना ! !


"दंगल" करण्यापेक्षा रेल्वे चे जे निकामी भाग स्फ़ोटाच्या जागी  पडले आहेत त्याची विल्हेवाट लावा.... जो कचरा आणि माती/सिमेंट/पत्रा चा ढिग आहे तो साफ़ करा...तिथे करा ना शक्तिप्रदर्शन !!!


तसच "बंद" !! कसले बंद करताय ?? त्यापेक्षा त्या दिवशी होणाऱ्या खरेदिवर २०% ३०% टॅक्स लावा आणि मिळणारे पैसे स्फ़ोटातिल जखमी/मृतांच्या नातेवाइकांपर्यंत पोचते करा !  नाहितर त्यातुन एखादे उध्वस्त झालेले स्टेशन चे नुतनीकरण करा...पण नविन करायचे नाही,उलट आहे ते बंद पाडुन ठेवायचे.... ही कसली घाणेरडी मनोवृत्ती ???


बस/खासगी गाड्या/दुकाने ह्याची जाळपोळ/मोडतोड करुन पोलिसांच्या लाठ्या खाण्यापेक्षा ह्या लोकांच्या दुवा मिळवा ना !!


काहिच जमले नाही तर निदान ह्या असल्या निरुद्योगांना प्रोत्साहन/पाठिंबा तरि देउ नका.....


तसेहि कोणी तरि सांगुन गेलेलेच आहे ना- जन पळभर म्हणतील हाय हाय !!