पाऊस

तो आला आणिक बरसून गेला
आसमंत हा  हरखून गेला


वैशाख वणवा विझवून सारा
वसुंधरेला भिजवून गेला

टपटप टपटप घाव घालुनी
विजयी योध्यासम मिरवून गेला


आतुरल्या त्या पशू पक्षांना
घास चाऱ्याचे भरवून गेला


कवेत घेऊन इंद्रधनूला
श्रावण सरींना फिरवून गेला


पाहून आसवे पाना फुलांची
भेट पुन्हाची ठरवून गेला


अजय