जीवनाच्या वाटेवर चालावे लागते एकट्याला,
थोड्या काळासाठीच संगती असतात सोबतीला.
जीवनाच्या वाटेवर चालावे लागते काट्या मधुन,
फ़ुले सुध्दा असतात कधी कधी अधुन मधुन.
जीवनाच्या वाटेवर मिळवण्यासाठी यश,
पहिल्यांदा पचवावे लागते अपयश.
यश नक्कीच मिळत प्रयत्नातुन,
पण प्रयत्न करावे लागतात मनातुन.
जीवनाच्या वाटेवर चालने नाही सोपे,
वाटेवरुन जाताना बसतात जबर धक्के,
लागतात साथीदार त्यासाठी पक्के.
जीवनाच्या अवघड वाटेवर साथ असते मनाची,
आपली साथ आपणच करायची.
जीवनाच्या वाटेवर असतात खाच खळगे,
या वाटेवर रुनझुनताना आयुष्य जाते सगळे.
तरीही या वाटेवर सगळे चालतच राहतात,
सुखाच्या एक झुळकेने दुःख सगळे विसरुन जातात.