खरं सांगायचा यत्न करतेय पण तुला नाही पटणार
पुन्हा पुन्हा नजरेत तुझ्या अविश्वास दाटणार
स्वतःलाच समजुन घ्यायचा यत्न करतेय पण तुला तसं नाही पटणार
तुला मात्र मी मुद्दामच त्रास देतेय असचं वाटणार
ईश्वराची योजना समजुन घेण्याचा यत्न करतेय
पुढे काय घडवायचय त्याला ते जाणुन घेण्याचा यत्न करतेय
माझी ताकद कमी पडतेय पण तुला नाही पटणार
तुला सारं मीच घडवुन आणतेय असचं का वाटणार ..?