एकाकी

चांदण्यांची गर्दी नभी दाटलेली
खंत एकाकीपणाची मनी साठलेली

सुर्यकिरणांनी सार्‍या धरेस व्यापलेले
सावलीत फुलं एक किरणास आसावलेले

शब्द जंजाल सर्वत्र हे पसरलेले
मौन संवाद साधण्या तरसलेले

थेंब थेंब धरणीवरी बरसलेले
तरी कुणी जीवना तरसलेले