सुखातल्या गावात

स्वप्नातल्या गावात माझ्या तू एकदा येऊन जा
सुखातल्या घरात इथल्या, तू एकदा राहून जा


नाहीत इथे दारे अन खिडक्या कुणाच्या मनाला
मोकळ्या मनाची माणसे, तू एकदा पाहून जा


जात पात ना वर्ण इथे माणुसकी हा एकच धर्म
माणुसकीच्या धर्माची, शिकवण जरा घेऊन जा


सुखाची चाकरी इथे अन सुखाचीच भाकरी
आलीस जर कधी, तर घास सुखाचे खाऊन जा


प्रेमाचाच वारा इथे नाही दुःखाला थारा
या प्रेमळ वाऱ्यावरती, ये जराशी मोहून जा


मनानेच श्रीमंत सारे इथे नाही कुणी भिकारी
वाटलंच तर तू पण, अशी श्रीमंत होऊन जा


 
अजय