अजूनही आभाळ भरून येतं...

अजूनही आभाळ भरून येतं...
आठवणींचा पाऊस पडतो
कोसळणाऱ्या सरींमध्ये...
मला तुझाच चेहरा दिसतो.


अजूनही आभाळ भरून येतं...
मन होतं ओलचिंब
बरसणाऱ्या थेंबाथेंबात....
तुझंच असतं प्रतिबिंब.


अजूनही आभाळ भरून येतं...
टपटपतात गाराच गारा
लपूनछपून भेटीस येतो....
तुझ्या गावचा गार वारा.


अजूनही आभाळ भरून येतं...
सुगंध येतो जाई-जुईस
वाट पाहून थकतो मी, पण...
.... तू मात्र येत नाहीस.


    (बंद ओठ माझे' मधून.)