काही चारोळ्या "बंद ओठ माझे' मधून...

१.


किती वेळ चालायचा असा
ओठांचा अबोल खेळ ?
असंच होत राहिलं तर
व्हायचा कसा मेळ ?


२.


माझ्या ओंजळीत साचलेले
सृष्टीच्या आनंदाचे तेजोमोती
अशाच हळूवार क्षणी...
तू जवळ हवी होतीस.


३.


एकमेकांना जपण्याइतपत
आपलं नक्कीच नातं....
बोलणाऱ्यांना बोलू दे
त्यांचं काय जातं ?