तुझे गीत झंकारलेल्या सुरांचे
तुझे गीत वेडावलेल्या क्षणांचे
तुझे पावसाळे किती पाहीले मी
तुझे हे उन्हाळे किती साहीले मी
तुझे गीत व्याकुळल्या वेदनांचे
तुझी वाट पाहुन मी स्तब्ध झालो
तुझ्या सावलीचे प्रतिबिंब ल्यालो
तुझे गीत अंधारल्या सावल्यांचे
तुझी आसवे थांबली पापण्यांशी
तुझी आसवे झाकोळलेल्या नभाशी
तुझे गीत बरसत्या पावसाचे