प्रिय पाडगावकर विचारताहेत
कधीपासुन
सांगा कसं जगणार?
कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?
प्रश्न एकच
इथे जगतोय कोण?
यंत्रच तर आहेत सगळी
रोजच्या नियमांची.
सण समारंभ गाठीभेटी
या होत्या उत्साहाच्या गोष्टी
त्यांचेही रुपांतर झाले यांत्रिकतेत, देखाव्यात
इथे जगतोय कोण?
जगणं हा आनंद
उपभोगायचा असतो स्वच्छंदपणे
मनाची कवाडे उघडी ठेऊन
मोकळा वारा आत घेउन
आज तर आहेत
सारीच कवाडं बन्द
आणि
तो वारा ही महाग झालाय.
आता आहेत फक्त प्रदुषणं
आम्हीच निर्मिलेल्या भ्रष्ट्राचाराची
आणि.....
मुलांना शिकवताहेत हे लहानपणापासुनच
दुटप्पी धोरण, स्वार्थीव्रुत्ती, 'मी'पण
आणि नितीमत्ता शिष्टाचारांची.
जणु हेच जगणं, हेच माणुसपण
मुलही मग मोठं होतं,
त्याला शिकवलेल्या माणुसपणाला जागतं.
मग सांगा
ते तरी काय उत्तर देणार
या प्रश्नाला?
सांगा कसं जगणार?
कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?