जीवन

विचारांच्या अंधारात
एकट्यानेच बसून
मनामध्ये दीप उजळावा
स्वतःच स्वतःला शोधण्याचा
एकदातरी प्रयत्न करावा
 
प्रयत्नांची वात करून
ध्येयाचे तेल ओतावे
यशाच्या प्रज्वलित दीपाला
आत्मविश्वासाचा आडोसा द्यावा

यशाची मौज लुटताना
इतरांनाही सामावून घ्यावे
स्वतः दुःखी असतानाही
दुसऱ्यांना सुख वाटावे

आपल्या सहवासातील व्यक्तींना
सतत हसत ठेवावे
त्यांच्या आनंदासाठी
स्वतःच्या मनालाही समजवावे

नदीचा प्रवाह बनून
सर्वांना तृप्त करावे
श्रीमंत सागरालाही हेवा वाटावा
असे जीवन जगावे