प्रेमाचा तारा

आकाश चांदण्यांचे, असती हजारो तारे


मिळून येती सारे, बने नभोमंडल माझे


विचार करता सार्यांचा, दिपले डोळे घारे


प्रेमाचा तो तारा बघुनिया विचार जीवास मारे    १


 


आली आठवण तुझी, सहवास, प्रीतीचे वारे


कृष्ण चोरिसे लोणी, तू चोरिलेस ह्रदय माझे


सुंदर त्या नभोमंडलातही असती मेघ काळे


प्रेमाचा तो तारा बघुनिया विचार जीवास मारे   २


 


विरहाश्रू घळला गालांवरूनी, चाखाले मी अश्रू खारे


असेल मी चुकलो.....नकोत कडवी फळे


क्षितीजापर्यंत नजर माझी वाट तुझी पाहे


प्रेमाचा तो तारा बघुनिया विचार जीवास मारे    ३