एकाकि

अर्ध्या वळणावरि सोबती
जुळवित जाती नातीगोती
परि पाहाता मागे वळुनि
सावलीच ती पडते दृष्टी


कधी भावे संगती कुणाची
मनी कामना सहवासाची
कधी नित्य सहवास असोनि
साथ तयाचि जाई विरुनि


असो साथ वा असो संगती
अंती तर कायाहि परकी
अज्ञाताचे प्रवासी आपण
आधारास हे एकाकिपण