वरून पाहिली गर्दी सरपटणाऱ्या किडी मुंग्यांची
खाली उतरलो तर त्यात सहज मिसळलो नि
त्यातलाच एक होऊन सरपटू लागलो मी
गर्दीचा बेफ़ानपणा अंगात झिरपवला मी
भानावर येत गर्दी म्हणाली 'अबे हट!xxx
दूर हो, परका कुठ्ला' मी घाबरलो,बावरलो
नि टरकलो सुध्दा!!पण तरीही पुन्हा पुन्हा
मिसळत राहिलो नि गर्दी दूर ढकलत राहिली
मग मी पुन्हा वर आलो तर सर्व नवे "उच्च"
फ़िदी फ़िदी नि मलाच म्हणती 'बघ गर्दीवाला'
संकोचुन अंग चोरलं नि नजर फ़िरवली तर काय
सर्वत्र तेच ते..........फ़िदी फ़िदी; वरमलो नि
पुन्हा खाली उतरलो तर गर्दी चं ढकलणं
पुन्हा वर आलो तर "उच्च"फ़िदी फ़िदी
अशा अव्याहत फ़ेऱ्यात सापडलो आहे नि
अव्याहताकडून अंताकडे जाताना उमगलो की
ज्याचं त्याचं एक जग आहे गर्दी चंही नि
"उच्च"चंही; त्यांचे त्यांचे आहेत अदृष्य नि
अलिखित संकेतही ; परिणामस्वरुप ही फ़रफ़ट
माझी ! अव्याहताकडून अंताकडे अव्याहताकडून अंताकडे !!!!!!