चांदण्या साक्षीस होत्या अन शशी आधार होता
सारखा आठ्वे मला काय तो शुंगार होता
शय्येची फ़ुलबाग होती अन रुपेरी आग होती
तो उषेला उगवणारा सोबती दिलदार होता
द्वंद श्वासांचे पसरले गंध होता मोग-याचा
कोण तु अन कोण मी वाद ना उरणार होता
द्वंद श्वासांचे संपले संपला शुंगार होता
पहाटेच्या किना-यावरी ठाकला संसार होता
-केदार जोशी