एक साल बाद...

नमस्कार मंडळी...विशेष करून मुंबईकर मंडळी,


भारतात आज २६ जुलै. बरोबर एक वर्षापुर्वी पावसाच्या धुमाकुळाने अवघ्या महाराष्ट्रात "महाराष्ट्र्बुडी" झाल्या सारखे वाटले होते (नियमाचे अपवाद वगळून).


"सहनशील"मुंबईकरांचे तर हाल विचारायची सोय नाही. सरकार गरजले की परत असे होवू देणार नाही. माध्यमांनी पण आरडाओरड केली, टिका केली, सामान्य मुंबईकरांनी चर्चा केली. जे मुंबईत असून देखील नियमाला अपवाद होते ते (झी टिव्हीवर दाखवल्याप्रमाणे) दुसऱ्यादिवशी पासून क्लब, उंची हॉटेलात खाणे करू लागले...


तुम्हाला काय वाटतेय आपण योग्य रस्त्यावर आहोत का? की "वाकड्या वळणाच्या"?