नव्हता एकदा स्वेटर तेव्हा,
थंडी मुळी वाजली नाही..
लाचारी चेहऱ्यावर मुळीसुद्धा दिसली नाही
जगण्याची जिद्द मी बघितली असली नाही..
नव्हता रेनकोट तेव्हा,
अंग जणु भिजत घातलं..
कुणाच्या रेनकोटनं ना कधी मोहात पाडलं
परिस्थितीनच असं मोहाला गाडलं..
नव्हतं मनपसंत खायला तेव्हा,
तोंडाला पाणी सुटलं नाही..
कुणी दिलं तरी चव घ्यावं असं वाटलं नाही
हे कुणाकडुनही कधी शिकावं लागलं नाही
नाही दिलास अन्न, वस्त्र, निवारा
त्याची ही आठवण नाही कडु..
स्वाभिमानाची देणगी दिलीस,
त्याचे उपकार कसे फेडु..?