माझं मन...

काय सांगू तुला, माझं मन का हरवतं,


नयनांसमोर बघून तुला, मग ते ही सावरतं.


मनाचे हे प्रकार मला अगदी झंकारून टाकतात,


तू समोर येताच मग आनंदाचे वारे वाहतात.


माझ्या मना आहे एकच ठाव,


तुझ जिवन आहे ते माझचं गाव.


मन मंदिरी ठेवीन तुझीच मूर्ती,


जन्मभर करीत राहीन फ़क्त तुझीचं स्फ़ुर्ती.


मनाच्या या गाभाऱ्यात आहे तुझाच भाव,


येणार नाही कधी त्यात दुसऱ्या कोणाचाही नाव.


मनात आहे तुला भेटण्याची खंत,


करणार नाहीसना तु माझ्या या जिवनाचा अंत.


                                          "महेश भोसले"