वर्षश्राध्द

आज आहे माझ्या भवितव्याचे वर्षश्राध्द हे


गतवर्षी हाताला हात लावून मम म्हणत


मी अग्नीला तूप दिलं स्वाहाः म्हणत


नकळत भवितव्याला दिलेला अग्नी तो


आज पुरतं उमगलंय की भवितव्य नो मोर


पण म्हणून काय स्मृती जपायच्या नाहीत?


कटू असल्या तरी स्मृती(अस्थी) जपायला 


साजरं करतेय मी नि दरवर्षी करणार आहे


वर्षश्राध्द माझ्या भवितव्याचे......


     प्रे - पी चन्द्रा