रंग निराळा - भावनांचा

प्रत्येक दिवसाच मागणं


ह्या दिवसासारखं असावं


मी तुला, तू मला


असंच दररोज भेटावं . . . .


 



तुझ्या स्पशात अनुभवतो मी


आनंदाबरोबर साथीचा ओलावा


नयन -रम्य पावसाचा थेंब जसा


अलगद ओंजळीत झेलावा . . . .


 


तुझे डोळे खुणावतात


मी जातांना पाणावतात


नंतर ते जाणवतात


एखाद्या निरागस पक्षासारखे . . . .


 



नको जाउस रे .. ! म्हणत


केविलवाण्या नजरेत


भरलेला अथांग भाव


नयनी तुझ्या बुडालेला


माझ्या स्वप्नांचा गाव . . . .


 


गहिवरतो मी ...


भावना माझ्या मग नकळत


स्वाभिमानाचे वस्त्र ओढतात


पुढिल भेटिच्या क्षणांना त्या


विश्वासाने जोडतात . . . .