ग्लोबल व्हिलेज

एक होते खेडे खूप मोठे खेडे जेथे राहती सर्वच वेडे


कुणी स्वप्नवेडे कुणी ध्येयवेडे कुणी क्रिकेटवेडे


कुणी सिनेमावेडे कुणी पुस्तकातले किडे


पण ..........तेही शेवटी ठरतात वेडे...........१


सर्वात जास्त आवडे हे अंकल सॅमला हे खेडे


क्लिकच्या अंतरावर 'गेट्स' सम वेडे


वॉलस्ट्रीट्वर होते शेअर -अप डाउन वेडे


बेवर्ली हिल्सवर काही औरच ..........वेडे...........२


स्वप्नवेडे ध्येयवेडे क्रिकेटवेडे सिनेमावेडे


सर्वांच्या मानगुटीवर बसले संप्पत्तीवेडे


वेडे रहा वेडे रहा घोकती काही वेडे


शहाणे होऊ नका दरडावती धनवेडे.............३


 वाटा यूएस कडे -तोवरच  पायघडे


तोवरच आवडे  अंकल सॅमला हे खेडे


पंगा घेणाऱ्याना शासन नक्की असे


अंकल सॅमचा वचक तस्सा असे ...............४


ड्रॅगन असो की असो महान भारत


की असो उद्दाम सद्दाम वा ओसामा


वा असोत पित्ते व लाचार कुत्रे त्यांचेच


पंगा घेणाऱ्याना शासन नक्की असे ..............५


 


 


पी चंद्रा