खेळ पावसाचा

थाम्ब आता थाम्ब थोडा, थाम्बव तुझा हा खेळ सारा


नकोस आता बरसू वेड्या, भिजून गेला सन्सार सारा.


नद्या धरणे भरून गेली, शेते गेली पण्याखाली,


काडी काडीचा सन्सार गेला, पावला खालची जमिन गेली.


'जीवना'नेच केला रे 'जीवना'चा अन्त,


सान्ग  आता रे कशाची करावी खन्त?


आभाळान झोडपल, पाण्यान बुडवल,


दाद मागावी कुणाकडे धरणीन ही झिडकारल.


खरच, वेड्या थाम्ब आता, सावरू दे रे या दुनियेला,


नव्या अस्तित्वापायी नवी आव्हाने पेलण्याला.


 नवी दिशा,  नवी आशा, नवी सुरूवात, नवी वाट,


पुनवेला उगवू दे रे पुन्हा एकदा यशस्वी पहाट.


 


------ प्राजू.