नव्हतास तू तेव्हा

नव्हतास तू तेंव्हा


मंतरलेली रात होती
तारकांची प्रणयी वरात होती


चंद्राची धुंद साथ होती
मौनाची नीरव साद होती


दिलात तुझी रे याद होती
सोबतीच्या तुझी आस होती


अनिवार अशी ती रात्र होती
फितूर सारी गात्रं होती


श्वासात आर्जवी ओढ होती
उरात हुरहुर गूढ होती


रात सरता सरत नव्हती
तुझ्याविना जणू व्याकुळ होती


निःशब्द उसासे टाकीत होती
उषःकाल ती मागत होती