मला तुझी क्षमा मागितलीच पाहिजे.
कशाबद्दल ?
संभ्रम वाढतोय पण उकललेच पाहिजे
कशाबद्दल ?
कधी वाटतं, मी तुझ्याकडून अपेक्ष ठेवतो
त्याबद्दल ; पण त्यात वावगं तरी काय ?
कधी वाटतं, मी तुझ्यावर खूप चिडतो
त्याबद्दल ; पण अपेक्षाभंगानंतर दुसरं काय ?
कधी वाटतं, मी चिड्ल्यावर आकांड्तांडव करतो
त्याबद्दल ; पण त्याशिवाय हाती दुसरं आहे काय ?
कधी वाटतं, तुझी फ़रफ़ट -कारणीभूत मी ठरतो
त्याबद्दल ; एकदा सहजीवन पत्करल्यावर दुसरं काय ?
कधी वाटतं,मी खूप स्वार्थबुद्धीने वागतो
त्याबद्दल ; साधू संत नाही ना मग दुसरं काय ?
कधी वाटतं, कुणाचा तरी राग तुझ्यावर काढतो
त्याबद्दल ; राग हे अनुरागाचंच रुप ना मग दुसरं काय ?
अन्तिम्तः जेव्हा विवेक जागा व तीव्र होतो
तेव्हा मन शांत होतं नि कशाबद्दलचा कोलाहल
निवतो आणी एकच भावना तीव्रतेने बजावते
मला तुझी क्षमा मागितलीच पाहिजे.