नवल

नवल


मला न कळले


ऊन कोवळे


केंव्हा आले..?


मनी कवडसा


एक उबेचा


देवुन गेले..!


डोळ्यां माझ्या


दवबिंदुंचा


स्पर्श हवासा


शिडकून गेले..!


हळूवार ही


ओढ अनोखी


चित्ता गमली


रमले मी रे..


शल्य उरीचे


उरात सलते


विसरु पाही


तुझ्या सवे रे..


धीट होवुनी


कोंब दबेसे


उमले पाती


तुझ्या संगती..


ही नात्याची


ना रांगोळी


हा ना गोत्याचा


पिसारा..


नवरंगी ही


राजसबाळी


प्राण-फ़ुले रे


मनी उमलली...!


शीला