स्वप्नील डोळ्यानी तू वावरायचीस
नि लाजून हसायचीस ना!
तेव्हाच माझं मन म्हणालं मला
अरे, काहीतरी घडतय !
फ़ुशारुन पुढे म्हणालं"बघ बेट्या
तू अखेर जितलास की रे,
तिला तू मान्य आहेस बघ-
तुझ्या बेदरकारीसह,निर्विकारपणासह,
कठोरपणासह नि हावरेपणासहही !"
पण आज प्रसूतीगृहात कळतय की
त्या स्वप्नांचा स्वामी हा राजा नव्हे
तर होता आमचा राजकुमार !!!!!!!
पी चंद्रा