लेक माझा

आज पाहते त्यास मी अन, आठ्वते मज त्याचे बालपण


अवखळ तो अन मी ही अवखळ, हट्टी तो अन मी ही अविचल


चिडले रागावले घातले धपाटे, रडला  तो अन रडले मी पण


आज म्हणतो पण लेक माझा, यशात माझ्या तुझाच ग वाटा 


किती ठरवले नाही रडायचे पण, डोळ्यात दाटले पाणी टचकन