मायमाऊली

भावसुमांची भरून अंजली
शुद्ध भक्तीची माळ गुंफिली
नतमस्तक मी तुझ्या पाऊली
येई येई गे माय माउली..


विशुद्ध अंतर पूजा करिते
मृदुल मनी आरास सजविते
संत,शूरांची स्मृती आळविते
हो प्रसन्न हे मराठी माते


या विश्वाच्या कवन्या कोणी
वा जावो यवनांच्या योनी
साद तुझी गं रंगवी मनी
स्फुल्लिंग फुलवी महाराष्ट्र जीवनी..


मायबोली तव अफाट किमया
दिली मजला मातेची माया
तेज देह प्रखर राष्ट्र कराया
विनविते यास्तव ही शब्दप्रिया..


(मूळ 'शब्दप्रिया' या कविता संग्रहातून)