खरंच "बाप" ह्या शब्दाचं सगळयांनाच वावड असतं
बाप हाही पालक असतो हे ही जग विसरतं
आहे आई वात्सल्य रुपी जगरहाटी असे मान्य ही
परी पहाड असे बाप ही मान्य करारे कधीतरी
खरंच बाप ह्या शब्दाचं सगळयांनाच वावड असतं !
कौसल्येचा राम,यशोदेचा कृष्ण,
जिजाउचा शिवा ह्याचंच जग कौतुक जग करतं,
पण दशरथाचे दुःख,वासुदेवाचे धारीष्ट्य,
शहाजीचा त्याग ह्याला मात्र जग विसरतं
खरंच बाप ह्या शब्दाचं सगळयांनाच वावड असतं!!
साधी सरळ गोष्ट असते,
भाजलं कापलं तरी आई आठ्वते,
पण साक्षात मृत्यू समोर येताच,
बापाचीच मात्र आठ्वण होते
मुलगी सासरी जातांना मोकळेपणाने आई रड्ते,
वडीलकीच्या जबाबदारीनं बापाची मात्र पंचाईत होते
मग दुःख विसरावं लागतं,
जबाबदारीची जाणीव असते
सगळे दुर गेल्यावर एकांतात मात्र रडु फ़ूट्ते
खरंच बाप ह्या शब्दाचं सगळयांनाच वावड असतं!!!
शरद खोलगडे.