हल्ली तसा गुलाबी रंग
क्वचितच असा दिसतो
कागद बरेच दिवस राहिला
की हमखास पिवळा पडतो
रंगांची उधळण चुकवायला
कातडे कितीही ओढले
तरी पापणीखाली रक्त सारे
लालच गोठते
या प्रचंड मोठ्या सूक्ष्मदर्शकावर काम करणाऱ्यांनी
कसले चष्मे लावलेत?
या धूसर संधिप्रकाशात हा काळा गॉगल
माझा मीच लावलाय
कधीकधी सावलीतसुद्धा डोळे खूप दुखतात हो!