पुन्हा....

मंतरले दिन परतूनी यावे
हलकेच पुन्हा प्रीतीत फुलावे


नकळत तुजला हळुच पहावे
ओठांत चांदणे पुन्हा खुलावे


नयनांतूनी संकेत कळावे
गोड गुपित हृदयात जपावे


पुन्हा रुसावे पुन्हा हसावे
रंग फुलांचे गाली दिसावे


होवूनी धुंद सर्वस्व लुटावे
फिरुनी अपुले मीलन व्हावे