स्वातंत्र्यवीर सावरकर - एक अग्रणी भाग १

*१९०६ साली पुणे येथे परदेशी कापडाची जाहीर होळी करुन स्वदेशीचा उद्घोष करणारा प्रथम भारतीय


*परदेशी कापडाच्या होळीवरुन ब्रिटिश सरकार अनुदानित महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकलेला प्रथम विद्यार्थी


*लोकमान्य टिळकानी स्वराज्य चळवळीचे रणशिंग फ़ुंकण्यापूर्वी  भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची जाहीर मागणी करणारा प्रथम भारतीय


*बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण होऊनही राजकीय विचारांच्या कारणासाठी ब्रिटिश सरकारकडून पदवी नाकारण्यात आलेला पहिला देशभक्त


*प्रखर राष्ट्रभक्तीमुळे मुंबई विश्वविद्यालयाकडून पदवी हिरावून घेतलेला पहिला पदवीधर(त्यानंतर ४९ वर्षानी एप्रिल १९६० साली याच विश्वविद्यालयाने आपला निर्णय बदलून ही पदवी स्वातंत्र्यवीर सावरकराना पुनःप्रदान केली) 


*राष्ट्रीय स्वातंत्र्याचे प्रश्न आंतर्राष्ट्रीय पटलावर पूर्णांशाने


आणी यशस्वीपणे मांडणारा पहिला नेता


प्रकाशकः पतित्पावन मंदिर संस्था, रत्नागिरी


 


परांजपे चंद्र..