आतल्यासहित माणूस नेहरू सेंटर च्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात!

नेहरू सेंटर, वरळी यांच्या कलाविभागातर्फे दर वर्षी राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही हा महोत्सव साजरा होतोय १४ ऑगस्ट म्हणजे आजपासूनच. हे या महोत्सवाचे दहावे वर्ष. 


यावर्षीच्या महोत्सवात १० दिवसांमधे अनेक नवीन नी जुन्याजाणत्या रंगकर्मींची नाटके होणार आहेत. त्यामधेच 'आतल्यासहित माणूस' या माझ्या प्रयोगाचीही निवड करण्यात आली आहे. दिनांक १७ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता हा प्रयोग होणार आहे.


प्रयोगाची वेळ ७५ मिनिटे, मध्यांतर नाही.
१२ वर्षाखालील मुलांना न आणल्यास बरे.


सर्वांनी जरूर या.


नीरजा