इराणच्या अध्यक्षांचा ब्लॉग

इराणच्या अध्यक्षांनी स्वतःचा ब्लॉग सुरू केलाय म्हणे.(बातमीसाठी दुवा )
ब्लॉगचा दुवा येथे आहे.
तर या ब्लॉगवर कोपऱ्यात एक कौल आहे.तिथे मी नाही या पर्यायवर टिचकी मारून पाहिली.पण सर्वर बिझि आहे असा संदेश आला.म्हणून मी पुन्हा प्रयत्न केला आणि तसाच संदेश. असं ३-४ वेळा झाल्यावर शेवटी मी नाही वर टिचकी मारली तर लगेच माझा कौल नोंदला गेला.
असंच तुमच्याही बाबत घडतंय का?