हा भगतसिंग, हाय हा

हा भगतसिंग, हाय हा


जाशी आजी,फ़ाशी आम्हास्तवचि वीरा हाय हा!


राजगुरु तू हाय हा!


राष्ट्र समरी वीर कुमरा, पडसि झुंजत,हाय हा!


हाय हा, जय जय अहा!


हाय हायचिं आजची, उदयीकच्या जिंकी जया!!


राजमुकुटा तो धरी


मृत्यूच्या मुकुटासि आधी बांधि जो जन निजशिरी!


शस्त्र धरुचि अम्हि स्वतः


धरुनि जें तूं समरिं शत्रुशि मरसि मारिता मारिता!


अधम तरी तो कोणता?


हेतुच्या तव वीरतेची जो न वंदिल शुद्धता!!


जा हुतात्म्यानो, अहा !


साक्ष ठेऊनि शपथ घेतो आम्हि उरलों ते पहा !


शस्त्र्संगर चंड हा


झुंजवुनि की, जिंकुचि स्वातंत्र्यविजयास पहा !


हा भगतसिंग, हाय हा


स्त्रोत <समग्र सावरकर-काव्य विभाग