व्यवसाय

याहू वर आलेल्या एका व्यनी चे स्वैर भाषांतर -


वडिल - बेटा तुला माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करावे लागेल,


मुलगा - नाही बाबा माझी बायको मीच शोधणार !


वडिल - पण बेटा ती बिल गेट्स ची मुलगी आहे.


मुलगा - खरच ?? .... असे असेल तर मग ठिक आहे.


 


( पुढे बाप बिल गेट्स ला भेटायला जातो.)


वडिल - माझ्याकडे एक चांगला मुलगा आहे तुमच्या मुलीसाठी.


बिल गेट्स - पण माझी मुलगी अजुन खुप लहान आहे लग्नासाठी.


वडिल - अहो पण मुलगा वर्ल्ड बँकेचा उपप्रमुख आहे.


बिल गेट्स - खरच ?? .... असे असेल तर मग ठिक आहे.


 


(सरतशेवटी बाप वर्ल्ड बँकेच्या प्रमुखाला भेटायला जातो)


वडिल - साहेब माझ्याकडे एक चुणचुणीत तरुण आहे जो तुमच्या बँकेचा उपप्रमुख म्हणुन योग्य आहे.


प्रमुख - अरे बाबा पण माझ्याकडे आधीच गरजेपेक्षा जास्त उपप्रमुख आहेत.


वडिल - अहो पण तो बिल गेट्स चा जावई आहे.


प्रमुख - खरच ?? .... असे असेल तर मग ठिक आहे.


 


व्यवसाय हा असा केला जातो.