एक प्रवासवर्णन आमचेही!!! - ३

महभाग - १
भाग - २
थोडया विचारांती आम्ही श्रीवर्धनला प्रथम जायचा निर्णय घेतला.


साधारणपणे ३० / ४० मिनीटात आम्ही श्रीवर्धनला पोहोचलो असू, आम्ही वेळ न दवडता सरळ समुद्राकडे कूच केले. पण काय सांगू समुद्राची अवस्था पहावत नव्हती, अगदी मुंबई इतकी खराब नसली तरी बिकटच होती. सगळा गाळ किनाऱ्यावर येउन पडला होता. वाळुमधे थोडेसे ऑइल डोकावत होते.. आणि .... जाऊदे.

१) श्रीवर्धनचा समुद्रकिनारा.



घरी सगळ्यांना खुशाली कळवली आणि आम्ही लगेच हरीहरेश्वरला जायला निघालो. आमचा प्लॅन आम्ही कुठेच बुकिंग न केल्यामुळे एकदम flexible होता. (एका वाक्यात ३ ईंग्रजी शब्द कट्टर मराठी मनोगतांनो या पामरास माफ़ करा.) 

हरीहरेश्वर मात्र फारच सुरेख होते. छोटीशी टुमदार घरे, उंचच ऊंच झाडे रस्त्याच्या कडेकडेने. निरनिराळी हॉटेल्स आणि घराघरांतुन राहाण्याची सोय असल्यामुळे, रहायचे कुठे ह्याची चिंता नव्हती. सामान गाडीतच ठेवून आम्ही आधी देवदर्शन करून घ्यायचे ठरले. अलिबागच्या घरून आणलेले नारळ देवासाठी काढुन घेतले. इथे मात्र पाउस साफ थांबला असल्यामुळे उकाडा छानपैकी जाणवत होता.


देव-दर्शन करून आम्ही रहायची सोय कुठे होते का ते पहायला निघालो. MTDC चे एक अप्रातिम रिसॉर्ट आमच्या द्रूष्टीस पडले आणि गाडी तिकडे वळवली. छोट्याशा टूमदार A/c Huts पाहून मन अगदी हर्शितच झाले. पण दुर्दैवाने तिथे एकही रूम रिकामी नव्हती. असेच काहीसे इतरही हॉटेल्स्मधेही झाले. कोणाच्या घरी उतरण्याची माझी इच्छा नव्हती कारण शेवटी ते कोणाचे तरी घर असते आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात. ;)


२) हरिहरेश्वरचा किनारा.


असेच हॉटेलच्या शोधात आम्ही आता बागमांडला पर्यंत येऊन पोचलो. (हरीहरेश्वरच्या पूढे ३ किमी) आणि कळून चुकले की इथे काहीही होण्यासारखे नाही. पण येथील रस्ता आणखिनच वेगळा आणि अरुंद होता. एका बाजुला खाडी आणि दुसऱ्या बाजूस लाल माती.

३) हरिहरेश्वर ते बागमांडला रस्ता.. खाडी लागायच्या आगोदर


आता पुढील हॉल्ट दिवेआगारला करण्याशिवाय पर्यायच नव्हता...
क्रमशः...