नारोशंकराचें देवालय

      (शार्दूलविक्रिडित)


दिल्लीचे पद हालवोनि वरिली तेजें जिंहीं संपदा !


राहोनि निरपेक्ष वाहुनि दिली श्रीशंभुच्या सं-पदां !!


होते ते तुमचे सुपूर्वज असे यत्कीर्तिते ना लय !


 नारोशंकराचें असे कथेतसे आम्हांसि देवालय !!


स्त्रोत<समग्र सा.<काव्य<१९००