हे अंदमान पर्व आलेच नसते तर...............

मला वाटते की हा एक महत्वाचा टप्पा आहे‌. स्वातंत्र्यवीरानी इंग्लंड ला परत  जाऊन व अटक करवून घेऊन त्यांच्याही नकळत, स्वतःच्या आयुष्यातही


व राष्ट्राच्या इतिहासातही,त्यानी दोन भाग करुन टाकले.


ज्या भाग करणाऱ्या पर्वाचे नाव आहे अंदमान पर्व.


हे अंदमान पर्व आलेच नसते तर............... 


हाच माझा चर्चेचा प्रस्ताव आहे.मी अशी कल्पना केली की हे अंदमान पर्व  आलेच नाही.


१)तर १९१० ते १९३७ अशी जी राजकारणात -एक पोकळी म्हणु या निर्माण झाली ती झाली नसती कदाचित् .


२)परदेशी पण स्वतंत्र राहून ही स्वातंत्र्यवीरानी इंग्रजाना त्राही भगवान केलं असतं.राशबिहारी व ते कालांतराने एकत्र येऊन सुभाषबाबू त्याना मिळाले आहेत हे चित्र नजरेसमोर आणलं तरी रोमांच उभे राहतात


३)इकडे हिंदुस्तानात एका महात्म्याची अनिर्बंध नेतागिरी


 राहिली नसती व राजकारणास एक वेगळीच पण सकारात्मक दिशा/वळण लागलं असतं कदाचित् .


४) अंदमानातील यातना न भोगल्याने स्वातंत्र्यवीरानी दसपट हिरीरीने क्रांतिचा झेंडा फ़डकवीत भारतीय स्वातंत्र्य बरेच आधी ही मिळवलं असतं कदाचित् .


५) अंदमानातील अनुभवाच्या परिणामस्वरुप हिंदु प्रखरता आली ती न येता समाजसुधारक सावरकर वेगळे दिसले असते कदाचित् .


असं बरंच काही सुचतय मला.


चर्चा करु या कां? प्रतिसादावरुन कळेलच म्हणा!