अंदमान पर्व आलेच नसते तर...२

शस्त्रगीत व त्यवरील विचार लिहताना चर्चेचा प्रस्ताव  अं प आ न त डोक्यात घोळत होत म्हणून एक नवीन मुद्दा सुचला तो असाः


२ऱ्या महायुद्धाचे वेळी त्यास इष्टापत्ती मानून स्वातंत्र्यवीरानी सैनिकीकरणावर भर दिला. तसेअच १ल्या महायुद्धाचे वेळी घडते तर ......तसे झाले असते जर अं प आ न त


तर मूळ अं प आ न त यावर मला स्वतःला असे वाटते की सावरकरांच्या वैय्यक्तिक जीवनातही स्पष्ट दोन कालखंड निर्माण होतात जे परस्पर विरोधी आहेत.आणखी एक उजेडात आलेला पैलू हे अलंकारासारखे वाटले तरी


वा वयपरत्वे तसे होतेच असे संयुक्तिक दाखले दिले तरी हा विरोधाभास उरतोच. वैय्यक्तिक जीवन बाजूस ठेवले व केवळ राष्ट्र व राजकारण याचा विचार करताही हे कालखंड परस्पर विरोधी आहेत. पहिला क्रांतिकारी


व दुसरा समाजसुधारणा. सावरकराना समाजसुधारक व्हायचं होतं ? नाही. मला तरी व इतरानाही ती अपरिहार्यता वाटते. तो सावरकरांचा मूळ पिंड ही नव्हे हे त्यांच्या लोकमान्यांच्या अनुनयावरुन सिद्ध होते. त्याच वेळेस आगरकरही कार्यरत होतेच की.आणि या बदलाचा फ़टका भारतीय राजकारणास जबर बसला हे सावरकप्रेमी व इतिहासतज्ञही मानतात. मी अनिर्बद्ध नेतागिरी या शब्दात लिहले आहे.या दोहोपैकी क्रांतिकारी सावरकराना


विरोधकांसह सगळे भगवा प्रणाम करतात. विरोधक तर पुढे सावरकर कसे वागले यांवर तुटून पडतात. पण क्रांतिकारी सावरकरांवर टीका करत नाहीत.कदाचित् लोकमान्यांचा पाठिंबा हे एक कारण असावे. क्रांतिकारी सावरकराना साथ कुणाची होती ? यावर जर जरा हटके विचार केला तर चष्मा साफ़ होतो व डिकुन्हा दिसतो असगर अली दिसतो.....इतरही दिसतात. पुढे याच सावरकराना एकांगी/दुराग्राही जातीय कट्टर हिंदू म्हणुन आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं.(लाक्षणिक अर्थ)


हे सर्व टळलं नसतं कां जर अंदमान पर्व आलेच नसते तर