मनोगतावर आलो तेव्हा वाटले होते बरे झाले
मिळेल ते मी वाचत गेलो प्रतिक्रिया देत गेलो
मार्ग दालनांचा उघडा झाला संचार माझा सुरू झाला
इथेच सगळा घोळ झाला प्रवास माझा दुष्कर झाला
आला आता कोण टिकोजी हा? असे काहिसे
त्यांस वाटले;सर्वत्र हा नि हाच कां? असे काहिसे
ही वाटुन गेलेः दाद नको ती ब्याद नको ती, क्वचित
असेही मनात आले.मैत्र वाढणे होईल कदाचित् !
परि मार्ग नसे काट्याविना! फ़ुले पसरली ती तू पहा
गुलाब,जाई जुई मोगरा, सडे पाडतो पारिजातक पहा
सृष्टीचा हा नियम असे की फ़ुलझाडे ही अन् कोरांटी
सवे वाढती सवे राहती सवेच झडती ;नसे उफ़राटी
कधी रीत ही; वाफ़्यात डोलते जाई जुईची वेल ही
पाहतो तो चमत्कार हा सवे तयाच्या डोलते घाणेरी ही!!!