डाळमेथी

  • तूर डाळ १ वाटी
  • मेथी पाव वाटी
  • १ टोमॅटो
  • हिन्ग,जीरं,लसुण,ग़ोडा मसाला,कढिपत्ता,मोहरी,तेल ई.
१५ मिनिटे
२ जणासाठी

मेथी एक दिवस भिजवून मोड काढून घ्यावेत.(मटकी प्रमाणे).

कुकर मधे मोड आलेली मेथी , तुरडाळ,कापलेला टोमॅटो,छोटा चमचा तेल टाकुन शिजवुन घ्यावे.

४/५ चमचे तेल गरम करुन मोहरी,जीरे,हळद,हिन्ग, बारीक कापून २/३ पाकळ्या लसुण आणि कढीपत्ता टाकुन फोडणी करावी. फोडणीवर शिजलेली डाळ मेथी टाकावी. चवीप्रमाणे मीठ,गुळ,मिरची पुड, थोडासा गोडा मसाला घालावा. छानशी उकळी आणावी.

भाकरी अथवा भाताबरोबर छान लागते. मेथीचा कडवटपणा जाणवत नाही.

 

 

 

 

 

मेथी आरोग्यासाठी लाभदायक असते.वातहारक आहे.

माझी आई