पौष्टीक मूग डोसा

  • मोड आलेले हिरवे मूग - २ वाटी,
  • १ लाल टोमॅटो , १ वाटी बारीक रवा, २ हिरव्या मिरच्या,
  • १ वाटी दही अथवा ताक , १/२ वाटी तांदुळ पिठी,
  • १ चमचा जिरं,चवीनुसार मीठ,छोटा तुकडा आलं
  • ३/४ पाकळ्या लसुण
१५ मिनिटे
३/४ जणासाठी

मूग,रवा, तांदुळ पिठी आणी सर्व पदार्थ मिक्सरमधे वाटून घेणे. मीठ , बारीक तुकडे करून आलं, लसूण वाटतानाच टाकावे.ताक अथवा दही घालुन सरसरीत करून घ्यावे. गरजे नुसार पाणी घालावे.

नेहमी प्रमाणे डोसे करावे.

१. चटणी अथवा लोणच्याबरोबर छान लागतात.

२. अतिशय पौष्टीक आहेत.

३. चवीत  बदल म्हणुन गाजर,मटार,मटकी,पालक घालु शकता.

४.तांदुळ पिठी साठी थालिपिठ भाजणी वापरुन अधिक पौष्टिक होतात.

५.वाढत्या वयाच्या मुलांकरता उत्तम पदार्थ.

 

आई