नाना आले म्हणाले वाचल्या तुझ्या कविता
पण गाढवा ना कुठे यमक ना कसली गेयता!
अशाने मराठीचे होणार कसे ?
कुठे घेऊन जाऊ नकोस लाज घराण्याला आणू नकोस...
नानांनी भरपूर साहित्य गिळले होते....
म्हणूनच म्हणे त्यांचे काय काय फुगले सुजले ..
बड्या बड्या कवींना म्हणे त्यांनी कच्चे सोलले होते
नानाना पुरते ठाऊक होते कविता म्हणजे काय असते
गमक यमक वृत्त अलंकार अभिरुची आविष्कार मात्रा सगळे सगळे
कविता कळली पाहिजे कवितेने वळले पाहिजे
दुर्बोध कविता करणाऱ्याला नाना उलटा टांगीत
प्रतिक्रिया देणे हा नानांचा जन्मसिद्ध हक्क होता
नानाना कविता कळण्याचा भयानक रोग होता!