अरे काय हे!

दिवस बदलत गेले शब्दा मधून माझ्या


नव्या व्याख्यांच्या ऐरणीवर घाव सोसतोच आहे


अर्थ पाळलेली सारी दारे "सावधान" च्या पाट्यांमागे...


तुमच्या गळ्यात शब्दांनो पाहतो  मालकीचे पट्टे घट्ट रुतणारे


तुमच्या गुरकावण्यातले इमान ? लाळ गाळतेच आहे


चेहरे रेखलेली सांज नायकिणीच्या घरी


आज शब्दांचा गाव सारा लालदिव्यांचा बाजार आहे....


विकले नाहीच ज्यांनी इमान आपले कसल्याच अर्थाला


अशा शब्दांचा प्रदेश कोण्या अज्ञाताच्या दिशेला ...


ह्या मिथकाच्या वाटेवरचा एक हत्ती


पिसारा फ़ुलावून कित्येक दिवस खुणावतो आहे!