जावयांना बढती

दस नंबरी दशमस्थानावरून तेरावा या अशुभ किंवा घातक स्थानावर ढकलले जाणार म्हणून समस्त जावयांना धडकी भरली होती. पण त्यांच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या, एवढेच नव्हे तर भटक्या प्लूटोचे ग्रहत्व रद्द करून जावयांच्या बढतीचा मार्ग मोकळा करून दिला गेला आहे.


ग्रहसमूहाबाबतीत मात्र "चौबेजी छब्बे बनने चले थे दुबेही रह गये" असे कांहीसे झाले आहे. आता ते रागावून अवकाशशास्त्रज्ञांच्या राशीला न लागोत!